YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 24:23-34

नीतिसूत्रे 24:23-34 MARVBSI

हीही सुज्ञाची वचने आहेत. तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही. “तू नीतिमान आहेस” असे जो दुर्जनास म्हणतो, त्याला लोक शाप देतील, राष्ट्रे त्याचा तिटकारा करतील; पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल. जो योग्य उत्तर देतो तो जणू काय ओठांचे चुंबन देतो. तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध. आपल्या शेजार्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नकोस; तू आपल्या वाणीने ठकवू नकोस. “मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन,” असे म्हणू नको. एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो; तेव्हा तो काटेर्‍यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले. ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला. “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,” असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील.