दुर्जनांचा हेवा करू नकोस, त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस. त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो. शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालव; बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते.
नीतिसूत्रे 24 वाचा
ऐका नीतिसूत्रे 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 24:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ