परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील; तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे; तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात; जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत; ह्यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व नीतिमानांच्या रीतीचे अवलंबन करावे. कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल.
नीतिसूत्रे 2 वाचा
ऐका नीतिसूत्रे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 2:16-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ