आळस घोर निद्रेत लोटतो; रिकामा फिरणारा उपाशी मरतो. जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षतो; जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल. जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस, क्रोधिष्ट मनुष्याने आपला दंड भोगला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुन्हा करावे लागेल. सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा. परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही. आळशी एकदा आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही. निंदकाला ताडन कर म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समंजसाला वाग्दंड कर म्हणजे त्याला कळेल. जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय. माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे. अधम साक्षी न्यायाची विटंबना करतो; दुर्जनांचे मुख अन्याय गिळते. निंदकांसाठी दंड, व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केले आहेत.
नीतिसूत्रे 19 वाचा
ऐका नीतिसूत्रे 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 19:15-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ