मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात. जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते. मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो; वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होतो. नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो. ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते. दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते. दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.
नीतिसूत्रे 15 वाचा
ऐका नीतिसूत्रे 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 15:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ