YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 13:1-12

नीतिसूत्रे 13:1-12 MARVBSI

सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही. तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वत: चांगले फळ भोगतो, पण कपटी इसमांच्या जिवाला बलात्काररूप फळ मिळते; जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते; आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो. नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो. नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्‍यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते. कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काहीएक नसते; कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात तरी त्यांच्याजवळ बहुत धन असते; मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो. गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते. घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते. आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.