मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो. आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते. मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो. कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो. नीतिमानाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील. असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते. उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. नीतिमान आपल्या शेजार्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो. आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे. न्याय्यत्वाच्या मार्गात जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही.
नीतिसूत्रे 12 वाचा
ऐका नीतिसूत्रे 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 12:13-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ