कृपाळू स्त्री सन्मान संपादते, आणि बलात्कारी इसम धन संपादतात. दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो. दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते. ज्याच्या ठायी अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो. जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्त्विकतेचा आहे त्यांच्याबद्दल त्याला आनंद वाटतो. दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे. एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल. जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो. पाहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल!
नीतिसूत्रे 11 वाचा
ऐका नीतिसूत्रे 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 11:16-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ