परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग की, तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजांतला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळावा. दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा; त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. तुमच्यामध्ये राहणार्या कोणा परदेशीयाला परमेश्वरा-प्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यांना अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा.” ज्या दिवशी निवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली; संध्याकाळी तो निवासमंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; निवासमंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत. मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत. कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत. कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हलला म्हणजे ते कूच करीत; दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. मेघ निवासमंडपावर छाया करून दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत; तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवत; परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळत.
गणना 9 वाचा
ऐका गणना 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 9:9-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ