YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 9:15-23

गणना 9:15-23 MARVBSI

ज्या दिवशी निवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली; संध्याकाळी तो निवासमंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; निवासमंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत. मेघ निवासमंडपावर बरेच दिवस राहिला तरी इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळीत असत व कूच करीत नसत. कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत. कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हलला म्हणजे ते कूच करीत; दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत. मेघ निवासमंडपावर छाया करून दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत; तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवत; परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळत.