परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग की, कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस, म्हणजे स्वतःला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला, तर त्याने द्राक्षारस व मद्य हे वर्ज्य करावे. द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये, द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये, एवढेच नव्हे तर ताजी किंवा सुकवलेली द्राक्षेसुद्धा खाऊ नयेत. जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियांपासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये. जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल, तितके दिवस त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नये; परमेश्वराला वाहून घेण्याचा त्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे आणि आपले केस वाढू द्यावे. जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये. त्याचा बाप, आई, भाऊ, बहीण ह्यांपैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये, कारण देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते. जितके दिवस तो आपल्याला वाहून घेईल तितके दिवस त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र राहावे. कोणी त्याच्याजवळ अकस्मात मरण पावले आणि त्यामुळे वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले त्याचे डोके विटाळले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या दिवशी त्याचे डोके मुंडावे, म्हणजे सातव्या दिवशी ते मुंडावे. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शनमंडपाच्या दाराजवळ याजकाकडे आणावीत; याजकाने एकाचा पापबली व दुसर्याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे. मग परमेश्वराला वाहून घेतलेले आपले सर्व दिवस त्याने पुन्हा पाळावेत. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा; तरीपण त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावेत.
गणना 6 वाचा
ऐका गणना 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 6:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ