YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 29:1-11

गणना 29:1-11 MARVBSI

सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय. परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत; त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे, आणि तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा; अमावस्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्यांबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पावे. ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे व कसलेच काम करू नये. परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत; त्यांबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे; प्रायश्‍चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबर त्याचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.