मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या. त्यांची नावे ही : महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. मोशे, एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्या उभ्या राहून म्हणाल्या, “आमचा बाप रानात मरण पावला; ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता तिच्यात तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला; त्याला मुलगे नव्हते. पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे; त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर तू त्यांना अवश्य वतनभाग द्यावा; त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर. तू इस्राएल लोकांना असे सांग, ‘कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे. त्याला मुलगी नसली तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे. त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे. त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वांत जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे, म्हणजे तो ते भोगील.”’ परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा.
गणना 27 वाचा
ऐका गणना 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 27:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ