गाढवी बलामाला म्हणाली, “तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय?” तो म्हणाला, “नाही.” तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते; आणि मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली; ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकले असते व तिला जिवंत ठेवले असते.” बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे; तू माझ्याविरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते; तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो.”
गणना 22 वाचा
ऐका गणना 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 22:30-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ