परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहचाल; आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो, यज्ञ करणार्याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे; आणि एक चतुर्थांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे. अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे. परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस. तू परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोर्हा अर्पण करशील, तेव्हा अर्पण करणार्याने गोर्ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धा हिन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस. प्रत्येक गोर्ह्यासह, प्रत्येक मेंढ्यासह, प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे. तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे. देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे. तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराप्रीत्यर्थ हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्याप्रमाणेच त्यानेही करावे. सर्व मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयासाठी एकच विधी असावा. तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हांला हा निरंतरचा विधी होय; परमेश्वरापुढे जसे तुम्ही तसाच परदेशीयही होय. तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयासाठी एकच नियम व एकच रिवाज असावा.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : ज्या देशात मी तुम्हांला नेत आहे तेथे तुम्ही आल्यावर त्या देशातले अन्न खाल तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावा. मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. मळलेल्या कणकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा.
गणना 15 वाचा
ऐका गणना 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 15:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ