YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 14:6-9

गणना 14:6-9 MARVBSI

आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले; आणि ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीती बाळगू नका.”