मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते. दीडशे यहूदी व शास्ते आणि आमच्याभोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक आमच्याकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत. दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे शिजवत तसेच माझ्यासाठी पाखरे तयार करत आणि दर दहा दिवसांनी सर्व जातींचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेवन केले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता. हे माझ्या देवा, जे काही मी ह्या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.
नहेम्या 5 वाचा
ऐका नहेम्या 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 5:16-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ