YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 2:1-6

नहेम्या 2:1-6 MARVBSI

अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?” राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली, आणि राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहूदा देशात, माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन.” राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, “तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील?” नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली.