हखल्याचा पुत्र नहेम्या ह्याचा वृत्तान्त : विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहूदातून आले; बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहूदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.” हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की, “हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्यासंबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस; तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे ह्याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन; पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’ पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस.
नहेम्या 1 वाचा
ऐका नहेम्या 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 1:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ