नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?”
मार्क 8 वाचा
ऐका मार्क 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 8:13-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ