तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.” त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले; पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले, आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कूम;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली; कारण ती बारा वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली, आणि तिला खायला देण्यास सांगितले.
मार्क 5 वाचा
ऐका मार्क 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:35-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ