YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 5:25-30

मार्क 5:25-30 MARVBSI

आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बर्‍याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. कारण ती म्हणत होती, “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?”

मार्क 5:25-30 साठी चलचित्र