तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे; तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बर्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. कारण ती म्हणत होती, “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?” त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले?” मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री, आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
मार्क 5 वाचा
ऐका मार्क 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:22-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ