मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला; आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे; तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते.
मार्क 5 वाचा
ऐका मार्क 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:21-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ