आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला. तो कबरांत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडेतुकडे केले होते; आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला; आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” कारण तो त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ.” त्याने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.” आणि “आम्हांला ह्या देशातून घालवू नकोस” अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता.
मार्क 5 वाचा
ऐका मार्क 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:2-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ