YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:3-12

मार्क 2:3-12 MARVBSI

मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की, ‘हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?’ ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने1 लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा ‘ऊठ, आपली बाज उचलून चाल,’ असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला) मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”

मार्क 2:3-12 साठी चलचित्र