मग असे झाले की तो शब्बाथ दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?” तो त्यांना म्हणाला, “दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही; म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभू आहे.”
मार्क 2 वाचा
ऐका मार्क 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 2:23-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ