[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यांना तो दुसर्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला. मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.]
मार्क 16 वाचा
ऐका मार्क 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 16:9-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ