सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.” मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”
मार्क 15 वाचा
ऐका मार्क 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 15:33-39
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ