इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली; आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” तरी त्याने पुन्हा नाकारले; मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखरच त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालीली आहेस [व तुझी बोलीही तशीच आहे.]” परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.” तत्क्षणी दुसर्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले; तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला.
मार्क 14 वाचा
ऐका मार्क 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 14:66-72
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ