YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:43-52

मार्क 14:43-52 MARVBSI

तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. त्याला धरून देणार्‍याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” तो आल्यावर लगेचच त्याच्याकडे गेला आणि “गुरूजी,” असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्याशेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही; परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणून हे असे घडत आहे.” तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले; परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.