YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:3-11

मार्क 14:3-11 MARVBSI

तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.” नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले; तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोईस्कर संधी पाहू लागला.