मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.” ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, “मी आहे काय तो?” तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” ते भोजन करत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “हे ‘[नवीन] करार’ प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.” मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले.
मार्क 14 वाचा
ऐका मार्क 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 14:16-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ