YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:12-16

मार्क 14:12-16 MARVBSI

बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत; त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा, म्हणजे कोणीएक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल; त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा : ‘गुरूजी विचारतात मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरण्याची जागा कोठे आहे?’ मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील; तेथे आपल्यासाठी तयारी करा.” मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.