नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परूशी व हेरोदी ह्यांच्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आपण खरे आहात व कोणाची भीडमुरवत धरत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की न द्यावा?” पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या.” त्यांनी ते आणले; तेव्हा त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.” येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.
मार्क 12 वाचा
ऐका मार्क 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 12:13-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ