YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:32-34

मार्क 10:32-34 MARVBSI

मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला, “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”