YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:2-9

मार्क 10:2-9 MARVBSI

परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’ ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.”