हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत. हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. हा पुरुष आम्हांला शांती होईल; जेव्हा अश्शूरी आमच्या देशात येऊन आमचे महाल तुडवील, तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही सात मेंढपाळ व आठ लोकनायक उभे करू. ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.
मीखा 5 वाचा
ऐका मीखा 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मीखा 5:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ