मीखा 2
2
गरिबांना छळणार्यांचा धिक्कार
1जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.
2ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.
3म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.
4त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”
5ह्यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहणार नाही.
6“संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
7अहो, ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोकहो, परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? ही त्याची कृत्ये आहेत काय? माझी वचने सरळपणे वागण्यार्यांचे बरे करत नाहीत काय?
8तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता.
9तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता.
10उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल.
11वायफळ व खोट्या चालीचा कोणी मनुष्य खोटे बोलून म्हणेल की, “द्राक्षारस व मद्य ह्यांचे मी भाकीत करीन,” तर तो ह्या लोकांचा संदेष्टा होईल.
12हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.
13तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.
सध्या निवडलेले:
मीखा 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.