त्या वेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” येशू त्यांना म्हणाला, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.”
मत्तय 9 वाचा
ऐका मत्तय 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 9:14-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ