YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:1-4

मत्तय 6:1-4 MARVBSI

माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल.