तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” परंतु त्याने उत्तर दिले की, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले; आणि त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’ आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले, आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’ मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला
मत्तय 4 वाचा
ऐका मत्तय 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 4:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ