त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.” ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.
मत्तय 3 वाचा
ऐका मत्तय 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 3:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ