त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.” ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”
मत्तय 3 वाचा
ऐका मत्तय 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 3:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ