YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:62-66

मत्तय 27:62-66 MARVBSI

दुसर्‍या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले, “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून तिसर्‍या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्‍कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.