ह्यास्तव कोणी तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो अरण्यात आहे,’ तर जाऊ नका; तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो आतल्या खोल्यांत आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील. त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’ तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील; ‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्ही दिशांकडून जमा करतील.’ अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
मत्तय 24 वाचा
ऐका मत्तय 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 24:26-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ