YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:23-27

मत्तय 21:23-27 MARVBSI

नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हांला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.” तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.