YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:10-17

मत्तय 21:10-17 MARVBSI

तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका पालथ्या केल्या. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.” मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले; व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला.