YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 19:19-26

मत्तय 19:19-26 MARVBSI

आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.”’ तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?” येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” हे ऐकून शिष्य फार थक्‍क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”