नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा; कारण तो फेफरेकरी असून त्याचे फार हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.” तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही. [तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.] ” ते गालीलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील आणि तिसर्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले. नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?” त्याने म्हटले, “हो, देतो.” मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?” “परक्यांपासून,” असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि आधी वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”
मत्तय 17 वाचा
ऐका मत्तय 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 17:14-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ